विसावा
Sunday, 18 February 2018
ती आणि तो रस्ता....
Sunday, 11 February 2018
माझं BMM (भाग 2) 🍂💞
माझं BMM (भाग 2)
आज मात्र तो दिवस होता..का कुणास ठाऊक
पाय मात्र तिथून निघत नव्हता..
Sir नको जाऊयात ना असेच सगळे म्हणत होते
पण वेळ मात्र आली होती
आपली ट्रेन रद्द व्हावी असे प्रत्येकाला वाटत होते
कारण प्रत्येकाचे मन अजूनही तिथेच होते...
सगळी मस्ती, hotel मधली मज्जा प्रत्येकाला आठवत होती..
तिथे असणारी प्रयेक व्यक्ती या अविस्मरणीय प्रवासाची कथा मनी साठवत होती...
12 तासाचा तो परतीचा प्रवास होता...
का कुणास ठाऊक पण आता तो प्रत्येकाला नको होता..
मुलांनी रात्री 3 पत्ती चा डाव सुरु केला..
180 रुपये कमावून आपला गिरीश मात्र त्यात जाम पुढे गेला....
सकाळ झाली नाश्टा आला..
शिक्षकांच्या फेऱ्या झाल्या...
काही सुचतच नव्हतं..
प्रयेक जण आप आपल्या धुंदीत होत....
सुरत आलं..सगळे हसत होते
गप्पा मारत होते गाणी गात होते..
विरार आलं डोळे पाणावले..
बोरिवली आणि Bandra station येऊच नये असे झाले...
खिडकीत पहिले तर सीमा mam बसल्या होत्या...
डोळे मात्र पाणावले होते
वेळ मात्र निघत होती..
सगळे एकमेकांकडे पाहत होते..
प्रत्येक जण रडत होता...
कोणी आतून तर कोणी बाहेरून...
काही Ola Cab, तर काही ट्रेन तर काही बस...
परतत होते..
रोने का नाही यार मिलेंगे ना हम लोग..
असे काही म्हणत होते...
पण असं म्हणता म्हणता ते सुद्धा रडत होते..
काय विलक्षण क्षण होते..
घड्याळाची वेळ मात्र थांबत नव्हती..
आज वेळही आपली परीक्षा पाहत होती..
प्रत्येकाचे रस्ते वेगळे होते..
आठवण मात्र एकच होती...(jaipur iv)
माझं BMM (भाग 1)
माझं BMM (भाग 1)
सुरुवात कुठून करू कळत नाहीय....
काही राहिलंय का मागे हेच सतत जाणवतंय
एवढं प्रेम कसं केलत आमच्यावर GD सर,
डोळे भरले तरी जयपूर हे ठिकाण मनातुन जात नाहीय.
12955 या आकड्या पासून सुरुवात झाली,
वेळ सायंकाळ ची होती मुले सगळी गडबडीत आली,
प्रत्येक जण शोधत होता आप-आपल्या मित्राला,
बघता बघता सगळी गर्दी एकत्र झाली....
S3,S4,S5 असंच काहीतरी सगळे बोलत होते..
कोणालाच काही कळत नव्हते...
गर्दीतून formal घातलेला गोरा असा मुलगा पुढे आला
दिगंबर नाव होते त्याचे कळलंच नाही कधी आपलासा झाला...
इथे तिथे- तिथे इथे सगळे बसून झाले...
बसले-हसले गप्पा झाल्या
ज्यांची होती जागा,
त्यांना मात्र दुसरीकडे adjust केले...
मज्जा मस्ती, खेळ गाण्याच्या भेंड्या बाहेर आल्या
काय सॉलीड वातावरण होते ते राव...
कुणासाठी नवीन,कुणासाठी जुनी तर कोणासाठी आपलीच..
अशा IV ची मात्र सुरुवात झाली....
12 तास झाले वेळ दुपारची होती...
बाहेर आलो 3 मित्र उभे होते..
आपल्या सर्वांकडे पाहत होते..
FY/SY, TY आणि Mcj ला ते बोलवत होते..
रसिका mam सोबत तन्मय जंगम च्या PUNCH ने दिवसाची सुरुवात व्हायची...
आणि किरण जंगम च्या भजन grop ने रात्र सरायची..
पण खरंच यार काय ती वेळ असायची....
एवढे सारे किल्ले फिरलो मस्ती केली..
त्या राजांची राजेशाही पाहतच राहिलो..
हे सगळं पाहता पाहता कळलंच नाही वेळ कधी गेली..
हा पण ते किल्ले पाहता पाहता आपल्या शिवाजी महाराजांची आठवण मात्र आली....
जयपुर,जोधपूर चे रंग पाहता पाहता त्या रंगात कधी रंगलो कळलंच नाही...
PINK सिटी पासून ते Blue सिटी फिरता फिरता अपूर्णच राहिली...
पण मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षीची IV जरा जास्तच वरचढ राहिली....
कोणी मोजडी तर कोणी बांधणी घेतली...
कुर्त्यांपासून ते लहान मुर्त्यांपर्यंत सर्वांनी shopping केली...
प्रियांका mam, सीमा mam पासून स्मिता mam पर्यंत सगळे बाजारात फिरत होते...
काय धम्माल होती राव..गौरांक sir सुद्धा बाजारात पळताना दिसून आले...
प्रमोद sir,purkar sir, आणि परुळेकर sir यांना खूप miss केलं...
पण पुढच्या वेळेला नक्की येतील असं त्यांनी promiss केलं..
काय great आहेत ना आपले शिक्षक जे दिवस भर आपल्यावर लक्ष ठेऊन काय हवे काय नको ? ते पाहायचे...
आणि रात्री उशिरा पर्यंत पहारा द्यायचे...
Mari गँग,गुलाबी gang, Bunty gang, Best Batch पासून सगळे एकत्र दिसून आले...
सगळे आले का ???
या वाक्या वरून सगळे हा तर Brand चं झाला..
सादिक,मितेश,तेजस,सिद्धेश हे सगळे आले होते..
आंबेकर आणि सॅम दादा पासून...
या सर्वांनी आपल्या कुटुंबाला सांभाळले होते...
8 दिवस कसे गेले काही कळलच नाही..
पण खूप मज्जा आली मित्रांनो...सगळे Days Celebrate करतांना...
आणि शेवटी ती वेळ आली...
मिठाई शॉपिंग करण्याच्या निमित्ताने दिवसाची शेवट झाली...
माझी आई.......💞🍂
माझी आई.......
माझी सावली हलकीच कुठेतरी तिला दिसली असेल..
माझी आई माझ्यावर आज नक्कीच रुसली असेल.....
जरीही कामात तिच्या रमली असेल.....
माझी आठवण मात्र नक्कीच आली असेल....
Tv. वरील विनोद पाहून जराशी हसली असेल...
पण माझी आई नक्कीच जराशी रुसली असेल.....
माहित आहे मला लक्ष कुठेच लागत नसेल....
तरीही ती थोडीशी रुसलीच असेल.....
कोलंबीची मच्छी आज बाजूला ठेऊन बसली असेल...
तरीही ती थोडीशी रुसलीच असेल.....
जरीही कठोर ती खूप दिसेल....
पण प्रेमळही ती तितकीच असेल....पण ती रुसली असेल
माहितीय मला काही गोष्टी तिच्या हातातही नसतील...
पण एका आठवणीत डोळ्यांत पाणी नक्कीच आणत असतील.....
जरीही राग तिच्या मनात नसेल...
पण माझ्या येण्याची उत्सुकता अजूनही तिच्या चेहऱ्यावर असेल.....
पुढील भेटीची ती नक्कीच वाट पहात असेल...
पण माझी आई आज नक्कीच माझ्यावर रुसली असेल...र
हस ना ग आई...मानलंस ना मुलगा मला आता...
मग देतो मी वचन.... हाच मुलगा तुझा नक्कीच तुझ्यासोबत शेवटपर्यंत असेल..... शेवटपर्यंत असेल...
Sunday, 4 February 2018
🌟असा नव्हतो मी.....🌟
🌟🌟🌟असा नव्हतो मी.....🌟🌟🌟
खरंच असा होतो का मी ???
आतून आवाज आला..अरे वेड्या हो असा नव्हतासचं तू......
मग ??? असा कसा झालो मी ?????
हळूच उत्तर मिळालं........
आहे कोणीतरी सावरायला ।।
म्हणून पडायला आवडलं......
आहे कोणीतरी डोळे पुसायला..
म्हणून रडायला आवडलं..........
आहे कोणीतरी बोलायला
म्हणूनच मन मोकळं करायला आवडलं......
आहे कोणीतरी काळजी करायला
म्हणून विश्वास ठेवायला आवडलं........
मैत्री चं नातं तर होतंच..... पण याच स्वभावामुळे
तेच नातं प्रेमात उतरवायला आवडलं....
खरंच असा नव्हतो मी...आहे ती शेवटपर्यंत साथ द्यायला ....
म्हणूनच जगायला आवडलं..... जगायला आवडलं....
Pramod Monde (Badyaa)
Friday, 2 February 2018
आयुष्य....😊🍂🍁
आयुष्य.....
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
जरा वेगळंच दिसत पण बरंच काही मनात असतं
पण इथे मात्र सांगायचं कोणालाच नसत...
इतरांबद्दल हसू येत तर कधी रडू येत
पण आपल्या विषयी असणारं सत्य नेहमीच कडू वाटत...
आपल्या स्वप्नांच्या मागे धावत तर सगळेच असतात
आज काल तर आपल्या सावल्या ही अनोळख्या झालेल्या दिसतात....
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
विचारांच्या वादात सगळेच गुंतलेले दिसतात
इथे आपल्या नात्यांपेक्षा बाहेरची माणसंच जास्त जवळची वाटतात....
इथे आम्ही नसून तू- आणि मी असंच असतं
संकटांच्या वेळी खऱ्या नात्यांच चित्र उमगत.....
इथे प्रत्येकजण आपापल्यात गुंतलेलं दिसतं
पण बाहेरच्या जगात बरंच काही घडून गेलेलं असत...
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
प्रमोद मोंडे.....
Wednesday, 31 January 2018
एक सायंकाळ....💞🍁🍁
🌟 🌟 🌟एक सायंकाळ......🌟🌟🌟
एके सायंकाळी असाच गर्दी च्या ठिकाणी चालत होतो
का ?कुणास ठाऊक ?? कोणत्या विचारात अडकलो होतो.....
याच गर्दीत एक चेहरा आपुलकीचा वाटला
का जणू...? अलगद मनात ठसला....
तिला पाहताच नक्कीच कुठेतरी लक्ष माझे विचलित झाले होते
पण हृदयाला नक्कीच कुठेतरी ते आवडले होते......
वाटत होतं पटकन जाऊन बोलावं का तिच्याशी
पण ...तिची जवळीक होईल का आपल्याशी ??????.....
असे असंख्य प्रश्न मनात उद्वभवत होते
पण हे वेडे मन कोड्यांचे-कोडे सोडविण्यातचं अडकले होते.......
वेळेची जाण मलाही होती......फरक फकत एवढा होता ....
ती निघून जात होती .. ती निघून जात होती...
त्या गर्दीत हलकेच तिने मागे वळून पाहिले
मग लक्षात आले पाहत तर ती पण होती पण बरेच काही राहिले....
तिच्या विचारात गुंतताना मी लगेच गुंतलो होतो.....
पण का कुणास ठाऊक वेळेचं गणित मी कुठेतरी नक्कीच चुकलो होतो..... चुकलो होतो...
(pramod monde) बंड्या..😘😇