Sunday, 4 February 2018

🌟असा नव्हतो मी.....🌟

       🌟🌟🌟असा नव्हतो मी.....🌟🌟🌟

खरंच असा होतो का मी ???
आतून आवाज आला..अरे वेड्या हो असा नव्हतासचं तू......

मग ??? असा कसा झालो मी ?????
हळूच उत्तर मिळालं........

आहे कोणीतरी सावरायला ।।
म्हणून पडायला आवडलं......

आहे कोणीतरी डोळे पुसायला..
म्हणून रडायला आवडलं..........

आहे कोणीतरी बोलायला
म्हणूनच मन मोकळं करायला आवडलं......

आहे कोणीतरी काळजी करायला
म्हणून विश्वास ठेवायला आवडलं........

मैत्री चं नातं तर होतंच..... पण याच स्वभावामुळे
तेच नातं प्रेमात उतरवायला आवडलं....

खरंच असा नव्हतो मी...आहे ती शेवटपर्यंत साथ द्यायला ....
म्हणूनच जगायला आवडलं..... जगायला आवडलं....
        Pramod Monde (Badyaa)

No comments:

Post a Comment