Sunday, 18 February 2018
ती आणि तो रस्ता....
Sunday, 11 February 2018
माझं BMM (भाग 2) 🍂💞
माझं BMM (भाग 2)
आज मात्र तो दिवस होता..का कुणास ठाऊक
पाय मात्र तिथून निघत नव्हता..
Sir नको जाऊयात ना असेच सगळे म्हणत होते
पण वेळ मात्र आली होती
आपली ट्रेन रद्द व्हावी असे प्रत्येकाला वाटत होते
कारण प्रत्येकाचे मन अजूनही तिथेच होते...
सगळी मस्ती, hotel मधली मज्जा प्रत्येकाला आठवत होती..
तिथे असणारी प्रयेक व्यक्ती या अविस्मरणीय प्रवासाची कथा मनी साठवत होती...
12 तासाचा तो परतीचा प्रवास होता...
का कुणास ठाऊक पण आता तो प्रत्येकाला नको होता..
मुलांनी रात्री 3 पत्ती चा डाव सुरु केला..
180 रुपये कमावून आपला गिरीश मात्र त्यात जाम पुढे गेला....
सकाळ झाली नाश्टा आला..
शिक्षकांच्या फेऱ्या झाल्या...
काही सुचतच नव्हतं..
प्रयेक जण आप आपल्या धुंदीत होत....
सुरत आलं..सगळे हसत होते
गप्पा मारत होते गाणी गात होते..
विरार आलं डोळे पाणावले..
बोरिवली आणि Bandra station येऊच नये असे झाले...
खिडकीत पहिले तर सीमा mam बसल्या होत्या...
डोळे मात्र पाणावले होते
वेळ मात्र निघत होती..
सगळे एकमेकांकडे पाहत होते..
प्रत्येक जण रडत होता...
कोणी आतून तर कोणी बाहेरून...
काही Ola Cab, तर काही ट्रेन तर काही बस...
परतत होते..
रोने का नाही यार मिलेंगे ना हम लोग..
असे काही म्हणत होते...
पण असं म्हणता म्हणता ते सुद्धा रडत होते..
काय विलक्षण क्षण होते..
घड्याळाची वेळ मात्र थांबत नव्हती..
आज वेळही आपली परीक्षा पाहत होती..
प्रत्येकाचे रस्ते वेगळे होते..
आठवण मात्र एकच होती...(jaipur iv)
माझं BMM (भाग 1)
माझं BMM (भाग 1)
सुरुवात कुठून करू कळत नाहीय....
काही राहिलंय का मागे हेच सतत जाणवतंय
एवढं प्रेम कसं केलत आमच्यावर GD सर,
डोळे भरले तरी जयपूर हे ठिकाण मनातुन जात नाहीय.
12955 या आकड्या पासून सुरुवात झाली,
वेळ सायंकाळ ची होती मुले सगळी गडबडीत आली,
प्रत्येक जण शोधत होता आप-आपल्या मित्राला,
बघता बघता सगळी गर्दी एकत्र झाली....
S3,S4,S5 असंच काहीतरी सगळे बोलत होते..
कोणालाच काही कळत नव्हते...
गर्दीतून formal घातलेला गोरा असा मुलगा पुढे आला
दिगंबर नाव होते त्याचे कळलंच नाही कधी आपलासा झाला...
इथे तिथे- तिथे इथे सगळे बसून झाले...
बसले-हसले गप्पा झाल्या
ज्यांची होती जागा,
त्यांना मात्र दुसरीकडे adjust केले...
मज्जा मस्ती, खेळ गाण्याच्या भेंड्या बाहेर आल्या
काय सॉलीड वातावरण होते ते राव...
कुणासाठी नवीन,कुणासाठी जुनी तर कोणासाठी आपलीच..
अशा IV ची मात्र सुरुवात झाली....
12 तास झाले वेळ दुपारची होती...
बाहेर आलो 3 मित्र उभे होते..
आपल्या सर्वांकडे पाहत होते..
FY/SY, TY आणि Mcj ला ते बोलवत होते..
रसिका mam सोबत तन्मय जंगम च्या PUNCH ने दिवसाची सुरुवात व्हायची...
आणि किरण जंगम च्या भजन grop ने रात्र सरायची..
पण खरंच यार काय ती वेळ असायची....
एवढे सारे किल्ले फिरलो मस्ती केली..
त्या राजांची राजेशाही पाहतच राहिलो..
हे सगळं पाहता पाहता कळलंच नाही वेळ कधी गेली..
हा पण ते किल्ले पाहता पाहता आपल्या शिवाजी महाराजांची आठवण मात्र आली....
जयपुर,जोधपूर चे रंग पाहता पाहता त्या रंगात कधी रंगलो कळलंच नाही...
PINK सिटी पासून ते Blue सिटी फिरता फिरता अपूर्णच राहिली...
पण मागील वर्षांच्या तुलनेत या वर्षीची IV जरा जास्तच वरचढ राहिली....
कोणी मोजडी तर कोणी बांधणी घेतली...
कुर्त्यांपासून ते लहान मुर्त्यांपर्यंत सर्वांनी shopping केली...
प्रियांका mam, सीमा mam पासून स्मिता mam पर्यंत सगळे बाजारात फिरत होते...
काय धम्माल होती राव..गौरांक sir सुद्धा बाजारात पळताना दिसून आले...
प्रमोद sir,purkar sir, आणि परुळेकर sir यांना खूप miss केलं...
पण पुढच्या वेळेला नक्की येतील असं त्यांनी promiss केलं..
काय great आहेत ना आपले शिक्षक जे दिवस भर आपल्यावर लक्ष ठेऊन काय हवे काय नको ? ते पाहायचे...
आणि रात्री उशिरा पर्यंत पहारा द्यायचे...
Mari गँग,गुलाबी gang, Bunty gang, Best Batch पासून सगळे एकत्र दिसून आले...
सगळे आले का ???
या वाक्या वरून सगळे हा तर Brand चं झाला..
सादिक,मितेश,तेजस,सिद्धेश हे सगळे आले होते..
आंबेकर आणि सॅम दादा पासून...
या सर्वांनी आपल्या कुटुंबाला सांभाळले होते...
8 दिवस कसे गेले काही कळलच नाही..
पण खूप मज्जा आली मित्रांनो...सगळे Days Celebrate करतांना...
आणि शेवटी ती वेळ आली...
मिठाई शॉपिंग करण्याच्या निमित्ताने दिवसाची शेवट झाली...
माझी आई.......💞🍂
माझी आई.......
माझी सावली हलकीच कुठेतरी तिला दिसली असेल..
माझी आई माझ्यावर आज नक्कीच रुसली असेल.....
जरीही कामात तिच्या रमली असेल.....
माझी आठवण मात्र नक्कीच आली असेल....
Tv. वरील विनोद पाहून जराशी हसली असेल...
पण माझी आई नक्कीच जराशी रुसली असेल.....
माहित आहे मला लक्ष कुठेच लागत नसेल....
तरीही ती थोडीशी रुसलीच असेल.....
कोलंबीची मच्छी आज बाजूला ठेऊन बसली असेल...
तरीही ती थोडीशी रुसलीच असेल.....
जरीही कठोर ती खूप दिसेल....
पण प्रेमळही ती तितकीच असेल....पण ती रुसली असेल
माहितीय मला काही गोष्टी तिच्या हातातही नसतील...
पण एका आठवणीत डोळ्यांत पाणी नक्कीच आणत असतील.....
जरीही राग तिच्या मनात नसेल...
पण माझ्या येण्याची उत्सुकता अजूनही तिच्या चेहऱ्यावर असेल.....
पुढील भेटीची ती नक्कीच वाट पहात असेल...
पण माझी आई आज नक्कीच माझ्यावर रुसली असेल...र
हस ना ग आई...मानलंस ना मुलगा मला आता...
मग देतो मी वचन.... हाच मुलगा तुझा नक्कीच तुझ्यासोबत शेवटपर्यंत असेल..... शेवटपर्यंत असेल...
Sunday, 4 February 2018
🌟असा नव्हतो मी.....🌟
🌟🌟🌟असा नव्हतो मी.....🌟🌟🌟
खरंच असा होतो का मी ???
आतून आवाज आला..अरे वेड्या हो असा नव्हतासचं तू......
मग ??? असा कसा झालो मी ?????
हळूच उत्तर मिळालं........
आहे कोणीतरी सावरायला ।।
म्हणून पडायला आवडलं......
आहे कोणीतरी डोळे पुसायला..
म्हणून रडायला आवडलं..........
आहे कोणीतरी बोलायला
म्हणूनच मन मोकळं करायला आवडलं......
आहे कोणीतरी काळजी करायला
म्हणून विश्वास ठेवायला आवडलं........
मैत्री चं नातं तर होतंच..... पण याच स्वभावामुळे
तेच नातं प्रेमात उतरवायला आवडलं....
खरंच असा नव्हतो मी...आहे ती शेवटपर्यंत साथ द्यायला ....
म्हणूनच जगायला आवडलं..... जगायला आवडलं....
Pramod Monde (Badyaa)
Friday, 2 February 2018
आयुष्य....😊🍂🍁
आयुष्य.....
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
जरा वेगळंच दिसत पण बरंच काही मनात असतं
पण इथे मात्र सांगायचं कोणालाच नसत...
इतरांबद्दल हसू येत तर कधी रडू येत
पण आपल्या विषयी असणारं सत्य नेहमीच कडू वाटत...
आपल्या स्वप्नांच्या मागे धावत तर सगळेच असतात
आज काल तर आपल्या सावल्या ही अनोळख्या झालेल्या दिसतात....
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
विचारांच्या वादात सगळेच गुंतलेले दिसतात
इथे आपल्या नात्यांपेक्षा बाहेरची माणसंच जास्त जवळची वाटतात....
इथे आम्ही नसून तू- आणि मी असंच असतं
संकटांच्या वेळी खऱ्या नात्यांच चित्र उमगत.....
इथे प्रत्येकजण आपापल्यात गुंतलेलं दिसतं
पण बाहेरच्या जगात बरंच काही घडून गेलेलं असत...
हे आयुष्यचं असं असतं इथे कोणी हसत तर कोणी रडतं
कारण इथे प्रत्येकाचं गणितचं वेगळं असतं....
प्रमोद मोंडे.....
Wednesday, 31 January 2018
एक सायंकाळ....💞🍁🍁
🌟 🌟 🌟एक सायंकाळ......🌟🌟🌟
एके सायंकाळी असाच गर्दी च्या ठिकाणी चालत होतो
का ?कुणास ठाऊक ?? कोणत्या विचारात अडकलो होतो.....
याच गर्दीत एक चेहरा आपुलकीचा वाटला
का जणू...? अलगद मनात ठसला....
तिला पाहताच नक्कीच कुठेतरी लक्ष माझे विचलित झाले होते
पण हृदयाला नक्कीच कुठेतरी ते आवडले होते......
वाटत होतं पटकन जाऊन बोलावं का तिच्याशी
पण ...तिची जवळीक होईल का आपल्याशी ??????.....
असे असंख्य प्रश्न मनात उद्वभवत होते
पण हे वेडे मन कोड्यांचे-कोडे सोडविण्यातचं अडकले होते.......
वेळेची जाण मलाही होती......फरक फकत एवढा होता ....
ती निघून जात होती .. ती निघून जात होती...
त्या गर्दीत हलकेच तिने मागे वळून पाहिले
मग लक्षात आले पाहत तर ती पण होती पण बरेच काही राहिले....
तिच्या विचारात गुंतताना मी लगेच गुंतलो होतो.....
पण का कुणास ठाऊक वेळेचं गणित मी कुठेतरी नक्कीच चुकलो होतो..... चुकलो होतो...
(pramod monde) बंड्या..😘😇
Sunday, 28 January 2018
माझा मी...😊
खूप छान होते ते दिवस....चिमुकल्या बोटांनी त्या बोटांनी आई चा तो पदर धरून शाळेत जायचो.. 'संध्याकाळी बाबांची आतुरतेने वाट पाहून माझा खाऊ द्या'.????..असे बोलायचो.......
"बाबू खाऊ नाहीे आणला आज" असे ऐकल्यावर, बाबांसोबत जा आता मी नाही बोलणार तुमच्याशी अजिबात कट्टी !!! घेण्याची मजा पण वेगळीच होती.....
शाळेत जाताना दुकानातल्या 'बोरकुट' आणि 'मोगली' ची पाकिटे जणू आपल्या हक्काचीच होती....त्यात भर magic ball हा प्रकार नक्कीच भर घालत असे...शाळेतली मस्ती मित्र भांडण खूपच अविस्मरणीय होती. शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर सगळ्या गर्दीत आपल्या आईची सावली शोधुन..दिसताच धावत जाऊन घट्ट मिठी मारणे दररोजच घडत असे...पण गर्दीतला तो आईचा एक चेहरा पाहून उत्सुकता मात्र कधीच कमी होत नसे..7 वर्षे अंधाराच्या खोलीत छोट्या दिव्यावर प्रसंगी मेंबत्तीवर अभ्यास करून प्रत्येक वर्षी पहिला क्रमांक पटकावून आई बाबांची मान मात्र मानाने वर करून दिली..नंतर कपडे तोकडे होत गेले..स्वतःच्या गोष्टी स्वतःच करायला सुरुवात झाली....
महाविद्यालयात प्रवेश मिळाला..2 वर्ष अभ्यास झाला..शिक्षणाची आवड तर लहानपणापासूनच होती आणि पुढे शिकणे तर भाग च होते...अनेक गोष्टी कानावर आल्या आणि शेवटी मनावर शेवटपर्यंत ठसली ती ...."मुलगा मोठा झाला आता" हीच!!!...लहानपणीच्या एकांतातून बाहेर पडून शेवटी..जबाबदाऱ्या वाढल्या..इच्छा वाढल्या, इतरांपेक्षा काही वेगळंच पण स्वतःचे पैसे खर्च करायला आज काल खूप छान वाटू लागले.....
जिवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळाल्या ते म्हणतात ना "आयुष्यात सोन्यासारखी माणसं फार कमी असतात" तशीच माणसं लाभली...शिवाय मनातले secrate सांगायला 2-3 मित्र जमले. आकर्षण उमगले, आणि बरंच काही....पण जरा सगळं कठीणच झालं. स्वप्नांचे बंगले बांधताना भविष्याची चालूल जाणवली जरा कठीणच वाटू लागले...पण जिद्द तर होतीच शेवटी वेळचं कमी पडू लागला clg-class-नोकरी जरा जास्तच जवळचे झाले..या वेळेच्या कोड्यात वेळ च काढणे आता अशक्य झाले...शिवाय रस्त्यात भेटलेल्या मित्राच्या "काय रे, आज काल कुठे असतोच दिसतचं नाहीस???" या प्रश्नाचे उत्तर. 'शेवटी वेळचं' नाही यामध्ये बदलू लागले..आपल्या आठवणीत रडणाऱ्या व्यक्तीचा चेहरा मात्र डोळ्यासमोर येत होता पण .भविष्यातील.स्वप्नांतल्या इमारतींची पायरी मात्र हळू हळू रचली जात होती...पण नाती मात्र दुरावली जात होती. त्यांतच "पैसा तर सगळेच कमावतात पण माणसं कमावणारा सगळ्यात जास्त श्रीमंत असतो हा विचार मनात फिरत होता"
सकाळी 6 वाजता घरातून निघताना काळजी ने पाहनाऱ्या आणि 'सावकाश जा आणि नीट घरी ये' असे म्हणून सकाळच्या उजेडात त्या माउली ची सावली मात्र नाहीशी होत असे.....मग दिवसभराचा तो वेळ कधी निघून जाई कळतच नसे....मनात विचार येई सोडून द्यावं सगळं का जगू नये..इतरांसारखं..पण "आयुष्यात तेच काम करण्यात जास्त मजा आहे..जेव्हा सगळे म्हणतात तू करू शकत नाही.." 'मग सकाळी 6 वाजता निघून रात्री 11.45 ला घरी पोह्चणाऱ्या त्या थकलेल्या सावलीची काय अवस्था होत असेल देव चं जाणे...' रात्री घरात येताच सकाळचे हसमुख चेहरे मात्र आता झोपलेले असत..पण त्याच एका चेहऱ्यांपैकी चिमुकलीचा तो शांत आणि गाढ झोपी असलेले ते रूप पाहून एक स्मितहास्य नक्कीच येत असे...शेवटी आपली वाट बघत असणारा mobile चा अलार्म लाऊन झोपी जाताना साथ देत असे...मनात चाललेल्या अनेक विचारांत झोप कधी येई कळतच नसे...अलार्म चा अचानक पणे झोप मोडून येणारा आवाज ऐकून मनात नेहमीच एक प्रश्न पडे 'बापरे!!!! सकाळ झाली पण आताच तर झोपलो होतो' .....वेळेच्या च्या या गणितात वेळ कधी निघून जाते कळतच नाही......शेवटी सकाळी पुन्हा उठून प्रवास सुरु होतो तो स्वप्नांचा पाठलाग करण्याचा......पाठलाग करण्याचा......
#आई #बालपण #जुन्या आठवणी #कुटुंब #विचार #करिअर #पैसा #उदय #प्रवास...
Wednesday, 24 January 2018
आयुष्य...🍁🍂
तशी तर आयुष्याची संकल्पना प्रत्येकासाठी वेगळीच असेल पण याचं अक्षरात संपूर्ण जग सामावलेलं आहे असं नक्कीच म्हणता येईल.. पण कधी कधी याच आयुष्याला कंटाळून माणसं जग सोडून निघून जातात. मग त्यात असणारी त्यांची वैयक्तिक कारणे हि असू शकतात.. लहानपणापासूनच आपले पालक आपल्याला नेहमी चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतात पण त्या संस्कारांचा आपण कितपत मान ठेवतो हे आपल्या प्रत्येकावर अवलंबून असते..हीच आयुष्याची व्याख्या प्रत्येकानुरूप बदलत असते....
लहानपणापासून आईच्या कुशीत निजून, बाबांना घट्ट मिठी मारून आनंदप्रसंगी आनंद व्यक्त करावयास लावणारे हे आयुष्य...शाळेत गेल्यापासून खोड्या काढणं तसेच सर्वाना त्रास देणं म्हणजे आयुष्य.. एखादं बक्षीस मिळाल्यावर मिळणारा आनंद मित्रांमित्रात दुभागणे म्हणजे आयुष्य..वर्गात पहिला नंबर येताच घरी येऊन आपल्या वडिलांनी आणलेले पेढे प्रेमाने खाण म्हणजे आयुष्य..शाळेत आपली चूक नसतानाही नाही बाई !!! त्यानेच मला मारलं.. असं उदगारण म्हणजे आयुष्य.. शाळेतील प्रत्येक क्रीडा स्पर्धांमध्ये रमून जाणं म्हणजे म्हणजे आयुष्य.. इतर वर्गात नाही पण आपल्याच वर्गात अभ्यासात top मारून Hero म्हणून ओळखलं जाणं म्हणजे आयुष्य.. आणि शेवटी अभ्यास पूर्ण झाला असूनही SSC च्या पेपर ला घाबरून जाणं म्हणजे आयुष्य.....
पुढे महाविद्यालयात गेल्यावर नवीन मित्रमैत्रिणी बनवणंम्हणजे आयुष्य..नंतर Freshers Party ची मजा घेणं म्हणजे म्हणजे आयुष्य..त्याच मित्रांसोबत एकाच दिवशी Bunk मारून फिरणं म्हणजेे आयुष्य.. आपल्याच वर्गात एखादी व्यक्ती जवळस वाटणं आणि तिच्यातच हळूहळू रमून तिला Prapose करणं म्हणजे म्हणजे आयुष्य.. टक लाऊन पाहून तिच्या स्वप्नात हरवणं म्हणजे आयुष्य..तिच्या विचारात गुंतत जाणं म्हणजे आयुष्य..तर तिच्या सोबत एखाद्या समुद्रकिनारी जाऊन एकांतात स्वप्ने रंगवून तिच्या सोबत मन मोकळं करणं म्हणजे आयुष्य.. त्यातील प्रेयसी चा भाग वगळला तर College Guoup सोबत मुसळधार पाऊस पडताना गरमा गरम चहा चा आस्वाद घेणं म्हणजे आयुष्य..शिक्षकांना Surprize देणं म्हणजे आयुष्य..तर आपल्याच group मधल्या मित्राला /मैत्रिणीला..मुलीच्या /मुलाच्या नावाने चिडवण म्हणजे आयुष्य.. तर त्याच मित्र / मैत्रिणीला दुःखात साथ देण म्हणजे आयुष्य..यांच्यासोबतच एखादी movie बघायला जाणं तसेच मित्राची setting लावण म्हणजे आयुष्य.. तर याच मित्रमंडळीत गंमतीने म्हटलेला माणसं बदलतात हा Dialog बोलणं म्हणजे आयुष्य....
नंतर पुढे serious होऊन carrer च्या मागे धावून आपली स्वप्न पूर्ण करणं म्हणजे आयुष्य..आपल्या collgege मध्ये काढलेल्या selfis वर..कधीतरी एक नजर फिरवनं म्हणजे आयुष्य.. आणि शेवटी एखादा दिवस ठरवून एकमेकांशी संपर्क साधून पुन्हा एकदा भेटून आपल्या आठवणी ताज्यातवण्या करणं म्हणजे आयुष्य...
हेच आपल्याला हसवणारं-रडवनारं आयुष्य एखाद्या उंच डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याच्या धबधब्यामूळे निर्माण झालेल्या इंद्रधनुष्यासारखं असतं.. ज्याचा आस्वाद घेऊन आपलं कधीही मन भरत नसत...इतरांच्या सुखात आपलं सुख शोधणे म्हणजे आयुष्य..जेव्हा सगळं संपून गेलंय असं वाटतं तेव्हांच जगाला काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतः मध्ये नवीन उमेद जागी होणे म्हणजे खरं...आयुष्य..
#स्वतः #आयुष्य #जीवन #सातत्य #उमेद #प्रेरणा..
प्रमोद मोंडे.....