Sunday, 28 January 2018

माझा मी...😊


खूप छान होते ते दिवस....चिमुकल्या बोटांनी त्या बोटांनी आई चा तो पदर धरून शाळेत जायचो.. 'संध्याकाळी बाबांची आतुरतेने वाट पाहून माझा खाऊ द्या'.????..असे बोलायचो.......
"बाबू खाऊ नाहीे आणला आज" असे ऐकल्यावर, बाबांसोबत जा आता मी नाही बोलणार तुमच्याशी अजिबात कट्टी !!! घेण्याची मजा पण वेगळीच होती.....
    शाळेत जाताना दुकानातल्या 'बोरकुट' आणि 'मोगली' ची पाकिटे जणू आपल्या हक्काचीच होती....त्यात भर magic ball हा प्रकार नक्कीच भर घालत असे...शाळेतली मस्ती मित्र भांडण खूपच अविस्मरणीय होती. शाळा सुटल्यावर शाळेच्या बाहेर सगळ्या गर्दीत आपल्या आईची सावली शोधुन..दिसताच धावत जाऊन घट्ट मिठी मारणे दररोजच घडत असे...पण गर्दीतला तो आईचा  एक चेहरा पाहून उत्सुकता मात्र कधीच कमी होत नसे..7 वर्षे अंधाराच्या खोलीत छोट्या दिव्यावर प्रसंगी मेंबत्तीवर अभ्यास करून प्रत्येक वर्षी पहिला क्रमांक पटकावून आई बाबांची मान मात्र मानाने वर करून दिली..नंतर कपडे तोकडे होत गेले..स्वतःच्या गोष्टी स्वतःच करायला सुरुवात झाली....
      महाविद्यालयात प्रवेश मिळाला..2 वर्ष अभ्यास झाला..शिक्षणाची आवड तर लहानपणापासूनच होती आणि पुढे शिकणे तर भाग च होते...अनेक गोष्टी कानावर आल्या आणि शेवटी मनावर शेवटपर्यंत ठसली ती ...."मुलगा मोठा झाला आता" हीच!!!...लहानपणीच्या एकांतातून बाहेर पडून शेवटी..जबाबदाऱ्या वाढल्या..इच्छा वाढल्या, इतरांपेक्षा काही वेगळंच पण स्वतःचे पैसे खर्च करायला आज काल खूप छान वाटू लागले.....
      जिवाभावाचे मित्रमैत्रिणी मिळाल्या ते म्हणतात ना "आयुष्यात सोन्यासारखी माणसं फार कमी असतात" तशीच माणसं लाभली...शिवाय मनातले secrate सांगायला 2-3 मित्र जमले. आकर्षण उमगले, आणि बरंच काही....पण जरा सगळं कठीणच झालं. स्वप्नांचे बंगले बांधताना भविष्याची चालूल जाणवली जरा कठीणच वाटू लागले...पण जिद्द तर होतीच शेवटी वेळचं कमी पडू लागला clg-class-नोकरी जरा जास्तच जवळचे झाले..या वेळेच्या कोड्यात वेळ च काढणे आता अशक्य झाले...शिवाय रस्त्यात भेटलेल्या मित्राच्या  "काय रे, आज काल कुठे असतोच दिसतचं नाहीस???" या प्रश्नाचे उत्तर. 'शेवटी वेळचं' नाही यामध्ये बदलू लागले..आपल्या आठवणीत रडणाऱ्या व्यक्तीचा चेहरा मात्र डोळ्यासमोर येत होता पण .भविष्यातील.स्वप्नांतल्या इमारतींची पायरी मात्र हळू हळू रचली जात होती...पण नाती मात्र दुरावली जात होती. त्यांतच "पैसा तर सगळेच कमावतात पण माणसं कमावणारा सगळ्यात जास्त श्रीमंत असतो हा विचार मनात फिरत होता"
      सकाळी  6 वाजता घरातून निघताना काळजी ने पाहनाऱ्या आणि 'सावकाश जा आणि नीट घरी ये' असे म्हणून सकाळच्या उजेडात त्या माउली ची सावली मात्र नाहीशी होत असे.....मग दिवसभराचा तो वेळ कधी निघून जाई कळतच नसे....मनात विचार येई सोडून द्यावं सगळं का जगू नये..इतरांसारखं..पण "आयुष्यात तेच काम करण्यात जास्त मजा आहे..जेव्हा सगळे म्हणतात तू करू शकत नाही.." 'मग सकाळी 6 वाजता निघून रात्री 11.45 ला घरी पोह्चणाऱ्या त्या थकलेल्या सावलीची काय अवस्था होत असेल देव चं जाणे...' रात्री घरात येताच सकाळचे हसमुख चेहरे मात्र आता झोपलेले असत..पण त्याच एका चेहऱ्यांपैकी चिमुकलीचा तो शांत आणि गाढ झोपी असलेले ते रूप पाहून एक स्मितहास्य नक्कीच येत असे...शेवटी आपली वाट बघत असणारा mobile चा अलार्म लाऊन झोपी जाताना साथ देत असे...मनात चाललेल्या अनेक विचारांत झोप कधी येई कळतच नसे...अलार्म चा अचानक पणे झोप मोडून येणारा आवाज ऐकून मनात नेहमीच एक प्रश्न पडे 'बापरे!!!! सकाळ झाली पण आताच तर झोपलो होतो' .....वेळेच्या च्या या गणितात वेळ कधी निघून जाते कळतच नाही......शेवटी सकाळी पुन्हा उठून प्रवास सुरु होतो तो स्वप्नांचा पाठलाग करण्याचा......पाठलाग करण्याचा......

#आई #बालपण #जुन्या आठवणी #कुटुंब #विचार #करिअर #पैसा #उदय #प्रवास...
      

1 comment: