Sunday, 18 February 2018

ती आणि तो रस्ता....

ती आणि तो रस्ता....


काय प्रिया ??  कोण प्रिया ?? अग हो तिचा खून झाला होता तिथे..हो असंच काहीतरी होत त्या सावंत बाई तर म्हणत होत्या बलात्कार झाला होता तिच्यावर बापरे !!!  हो ती तिथेच असते रात्रीचं नाही जात कोणी तिथून..त्या दोघी असंच काहीतरी म्हणत होत्या संपदा ची आई पुटपुटली...हो म्हणे दिसते ती.. अगं दिसते काय ? तिचा तर रडण्याचा आवाज सुद्धा ऐकलं होता म्हणे कोणीतरी. जाऊदे बाई कोण जातंय तिथून...
आज ती खूप खुश होती.. असणारच कारण तिच्या मेहनतीचे फळ आज तिला मिळाले होते. पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कधीही घडत नसते, कदाचित आज एक विलक्षण घटना तिच्या आयुष्यात घडली ज्यामुळे सगळेच बदलून गेले...


संपदा नाव होते तिचे, HSC परीक्षेत 90% टक्के गुण मिळवून तिने आपल्या वडिलांची शान वाढविली. एक मध्यमवर्गीय कुटुंब वडिलांनी इथून तिथून पैसे जमा करून फार कष्ट करून तिला शिकविले. आधीच फार खर्च झाल्यामुळे वाडीलांच्या डोक्यावरील भर कमी व्हावा म्हणून तिने आता Private ट्युशन घायला सुरुवात केली होती. पुढे जाऊन तिने मेडिकल चे शिक्षण पूर्ण केले. आणि एका नामनकीत हॉस्पिटल मध्ये इंटर्नशीप करण्याची तिला संधी मिळाली. घरचे भवितव्य आता तिच्या हातात होते. कारण आता पर्यंत तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तिने खंबीरपणे तोंड दिले होते.


संपदा इतर गोष्टीत ज्या प्रमाणे हुशार होती तितकीच ती दिसायला सुंदर आणि सुरेख होती. त्यामुळे कॉलेज पासून ते मेडिकल चे शिक्षण पूर्ण होईपर्यंत अनेक मूलं तिच्या प्रेमात वेडी होती. पूढे इंटर्नशीप ला आल्यावर हॉस्पिटल चे मालक डॉ.प्रसाद यांच्या मुलाचे तिच्यावर प्रेम जडले. राजेश नाव होते त्याचे तिला सुद्धा तो आवडायचा पण कधी बोलणे झाले नव्हते पुढे कामानिमित्त बोलणे वाढू लागले तो सुद्धा तिला आवडू लागला त्याने पुढाकार घेतला तिने होकार दिला हळू हळू भेटणे झाले. काम लवकरात लवकर संपवून ते दोघ एकमेकांना वेळ देत असत. मग त्यातूनच सिनेमा, फिरायला जाणे, एकांतात वेळ घालवणे असे त्यांचे चालू असे..बघता बघता दीड वर्षाची इंटर्नशीप कधी संपत आली कळलच नाही. उत्कृष्ट बुद्धिमत्ता आणि तिची कल्पकता वा इतर गुणांमुळे हॉस्पिटल मध्ये सुद्धा तिची कामगीरी ठळकपणे दिसत असे. त्यामुळे ती सगळ्यांचीच आवडती होती. तिच्या या यशस्वी प्रगतीमुळे प्रसाद सरांनी तिला 'बेस्ट इंटर्नशीप ट्रेनी ऑफ द इयर' का 'किताब देण्याचे ठरविले. शनिवारी रात्री 8 वाजता वेळ ठरली. बघता बघता तो दिवस आला संपदा फार खुश होती. तिचा सत्कार झाला तिला प्रमोशन सुद्धा मिळाले सर्वांकडून फार गोड कौतुक आणि प्रशंसा तिला क्षणोक्षणी मिळत होत्या. केक सुद्धा कापण्यात आज जणू तिचे स्वप्न पूर्णपणे साकार झाले होते. आता मात्र रात्रीचे 10 वाजले होते थोडा उशिरच झाला होता घर अवघ्या 25 मिनिटांवर असल्यामुळे संपदा ने राजेश ला नकार देऊन एकटं जाण्याचा निर्यय घेतला.


संपदा उशीर झाल्यामुळे पटापट पाऊलं टाकत चालली होती घनदाट अंधार होता. नेमकं आजच रस्त्यावरच्या लाईट जायच्या होत्या.. असंच काहीतरी बडबडत होती. तिने मोबाईल मधली टॉर्च चालू केली आणि पटापट चालण्याचा निर्णय घेतला...घनदाट अंधार त्यात दूरवर कुठेतरी कुत्री भुंकण्याचा आवाज..पावलं टाकत ती पटापट पुढे आली आता मात्र तीला रास्ता निवडायचा होता समोर एका झाडाच्या मागे दारूच्या नशेत धूत असलेल्या 4-5 मुलांचा आवाज येत होता..साला कोण नाय मिळाली ?? तू बांगड्या घाल बांगड्या..भाई भाई..जाऊदे शांत शांत... आजूबाजूला कोणीच नसल्याने ती फार घाबरली. त्यामुळे तिने दुसऱ्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला...मागे वळून पहिले कोणीच नव्हते..अचानक तिच्या खांद्यावर कोणीतरी हाथ ठेवला ती एकदम दचकली..अंग घाबरू नकोस मला सुद्धा आज जरा उशीरच झाला..मला सुद्धा याच रस्त्याने पुढे याचे आहे चल जाऊ आपण..तिच्या येण्याने आता मात्र संपदा ला धीर आला. आपल्यासोबत कोणीतरी आहे यामुळे आता मात्र तिची भीती दूर झाली. त्या दुसऱ्या रस्त्यावरून चालता चालता गप्पा मारत संपदा चे घर कधी आले तिला कळलच नाही...संपदा चे घर येताच ती उद्गारली. "माझे घर सुद्धा इथेच आहे पुढे मी जाईन.. आणि thanxx म्हणायच्या आतच ती अंधारात दिसेनाशी झाली..


घरी आई फार आतुरतेने वाट पाहत होती..पण आजच्या प्रसंगाची भीती अजूनही तिच्या मनात होती...फार थकल्यामुळे ती लगेच झोपी गेली...




काय प्रिया ??  कोण प्रिया ?? अग हो तिचा खून झाला होता तिथे..हो असंच काहीतरी होत त्या सावंत बाई तर म्हणत होत्या बलात्कार झाला होता तिच्यावर बापरे !!!  हो ती तिथेच असते रात्रीचं नाही जात कोणी तिथून..त्या दोघी असंच काहीतरी म्हणत होत्या संपदा ची आई पुटपुटली...हो म्हणे दिसते ती.. अगं दिसते काय ? तिचा तर रडण्याचा आवाज सुद्धा ऐकलं होता म्हणे कोणीतरी. जाऊदे बाई कोण जातंय तिथून...
धाड्कन संपदा झोपेतून जागी झाली...बापरे स्वप्न होत ते... बरं झालं  स्वप्नं च होत ते..आई धावत आली बाळा काय झालं ?? काही नाही आई स्वप्न होत ते.(डोळे पुसत) बाळा तू रात्री एकटी आलीस का ?? नाही ग आई एक मुलगी होती.. कोण मुलगी गं ?? अगं नाव..तीच नाव...तिने सांगितलं होतं मला...(विचार करत) हा आठवलं....अचानक संपदा ला घाम फुटला आणि ती निशब्द झाली..तिला काय बोलावे सुचेनाच कारण....


प्रिया!!! प्रिया नाव होतं तीच..पण तिने आपलं काम केलं होत....

#Fear #Horrer #truth #life #storytelling #life #काल्पनिक #कथा #भयकथा..


प्रमोद मोंडे

7 comments: